Monday, June 6, 2011

सोनईचे पुरातन जागृत श्री व्यंकटेश देवस्थान सोनईची माहिती


शनी शिंगणापूर जवळील सोनईचे ५०० वर्ष पुरातन जागृत श्री व्यंकटेश देवस्थान
श्री व्यंकटेश देवस्थान सोनई हे ५०० वर्षापेक्षा जास्त पुरातन मंदिर आहे. हे तिरुपती नंतर म्हणजे दोन नंबरचे जागृत पुरातन देवस्थान आहे. जे नेहमी तिरुपतीला जावू शकत नाहीत ते या देवस्थानला भेट देतात. भक्तगण भारताच्या सर्व राज्यातून दर्शनास येतात . शनी शिंगणापूर पासून ३ किलोमीटर वर सोनई गावात हे देवूळ आहे. तसेच राहुरीवरून आल्यास राहुरी सोनई रस्त्यावरील कमानीतून रेणुका माता मंदिरकडे जातांना उजव्या दिशेला फक्त २ मिनिटावर हे देवूळ आहे. आमचे गोसावी(साबळे) पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशजांना गोसावी यांचा वेश दिला व त्यांचा वेश परिधान करून यवनांकडून मार खाल्ला व त्यांना वाचवले म्हणून ह्या देवळाची जागा मिळाली व काही शेती मिळाली. पण त्यातून काही उत्पन्न कसणारे देत नाहीत. आमचे पूर्वजांनी तिरुपतीहून पितळी ७ बालाजीच्या प्रभावळी लक्ष्मी पद्मावतीसह येथे आणल्या व स्थापना केली. मंदिरात जागृत शाळीग्राम व पद्म, चक्र आहेत. देवीच्या तांदळा आहेत सध्या जेथे एसटी बस स्थानक आहे तेथे आमचे पुर्वाज्यांच्या ४ समाध्या आहेत. कारण त्यांनी श्री बालाजीना जिवंतपणी पाहिले. ती जागा आमची होती पण कूळ कायद्यात गेली व तेथे बस स्थानक झाले. हे सोनई गावाचे जागृत देवस्थान आहे. व शेरणी(गुळ ) देवाला अर्पण करून त्याचा प्रसाद भक्तगण सर्वांना वाटतात व नवस बोलतात.तसेच देवळाचे गच्ची तून पोळीचा प्रसाद टाकतात तो झेलून कपाटात, धान्यात किंवा तिजोरीत ठेवला कि संपत्तीची, धान्याची वृद्धी होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. दर वर्षी चैत्र द्वादशीपासून ५ दिवसाचा उत्सव भक्तगण मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. द्वादशीची रात्रीची पंगत रात्री १२ नन्तर महा आरती होवून बसते कारण श्री बालाजी रात्री १२ ला तिरुपती वरून येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. आधी पंगत कोणी करण्याचा प्रयत्न केल्यास ती वारयाने उधळून जाते. ५ हि दिवस ज्यांची पंगत आहे ते प्रसाद सर्वांना देतात. चतुर्दशीला गावातून ढोल ताशा व डिजे,वाजंत्री सह श्री ची मिरवणूक निघते व आमचे पूर्वजांच्या समाधी ला आरती करून बारव्या मध्ये स्नान पूजा करून पेठेतून राम मंदिरात पूजा करून परत मंडपात येते. ५ दिवस गावात उत्साहाचे व मांगल्याचे वातावरण असते. सर्व प्रांतातून भक्तगण उत्सवाला व देवदर्शनाला येतात. देवस्थान जीर्णोधार चालू आहे. देणगी स्वीकारली जाते. देवस्थानला श्री व्यंकटेश देवस्थान सोनई या नावाने देणगी पाठवता येते. युनियन बँकेचे सोनई येथील खाते क्र. ३२२४०२०१०००६९९५ असून या बँकेच्या कोअर बँकिंग सुविधा असलेल्या देशातील कोणत्याही शाखेत देणगी देता येईल . पुणे औरंगाबाद रोडवर घोडेगावला उतरून सोनईला येता येते. अधिक माहितीकरिता विश्वस्त श्रीनिवास गोसावी यांना ९६०४८५३७६० किंवा ९८२२२०८९१७ या सेलवर अथवा २०-२४४७५५७६ या फोनवर संपर्क साधावा, तसेच www.shri-vyankatesh-devasthan-sonai.blogspot.com या ब्लॉगवर देवस्थानची आधिक माहिती मिळेल.

श्रीनिवास गोसावी,
विश्वस्त